संस्थेविषयी सविस्तर माहिती

इतिहास, ध्येय आणि अध्यात्मिक वारसा

शांतिब्रह्म गुरुकुलम् — बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा इतिहास, वारकरी संप्रदायाचा शुद्ध वारसा आणि समाजासाठीचे योगदान.

शांतीब्रह्म कुरेकर बाबांचा सन्मान सोहळापूज्य कुरेकर बाबांचे पावन दर्शनमाउली महाराजांचा भावपूर्ण सत्कारअंकुश महाराज व सीताराम बाबांचा सन्मानउद्धव गुरुजी व अंकुश महाराज — गायन सेवामायेची भाकर — सेवेचा प्रसाद
शांतीब्रह्म कुरेकर बाबांचा सन्मान सोहळा
प्रवास

संस्थेचा प्रवास

01

स्थापना — 2016

वंचित कुटुंबे, ग्रामीण भाग आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांना दर्जेदार शालेय शिक्षण, आध्यात्मिक ज्ञान व मूल्यसंस्कार देणे हे मुख्य ध्येय.

02

700+ माजी विद्यार्थी

शिक्षणापासून वंचित मुलांना सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट. आजपर्यंत 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी येथे यशस्वीरीत्या शिक्षण पूर्ण केले आहे.

03

मोफत निवास व संस्कार

अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, शालेय शिक्षण आणि वारकरी संगीताचे संस्कार देऊन स्वावलंबी नागरिक घडवणे.

आमचे ध्येय

वंचित व अनाथ बालकांच्या जीवनात शिक्षण, संस्कार व अध्यात्मिक ज्ञानाची ज्योत पेटवून त्यांना स्वावलंबी, चारित्र्यसंपन्न व सुसंस्कृत नागरिक बनवणे.

आमचा दृष्टिकोन

महाराष्ट्रातील प्रत्येक वंचित मुलाला दर्जेदार शिक्षण व वारकरी संप्रदायाचे शुद्ध संस्कार मिळावेत आणि तो समाजाचा एक आदर्श सेवक व्हावा.

ह.भ.प. अंकुश महाराज कदम
संस्थापक

ह.भ.प. अंकुश महाराज कदम

(भागवताचार्य)

प्रतिष्ठित जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर, समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून महाराजांनी शांतिब्रह्म गुरुकुलम् ची स्थापना केली. अनेक अनाथ व वंचित मुलांच्या जीवनात त्यांनी शिक्षण व संस्काराची ज्योत पेटवली आहे.

वारसा

वारकरी संप्रदायाचा शुद्ध वारसा

ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव, एकनाथ महाराज यांसारख्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी क्षेत्रात, आमची संस्था वारकरी परंपरेचा शुद्ध वारसा जपत आहे.

हरिपाठ साधना
हरिपाठ साधना
ज्ञानेश्वरी पाठ
ज्ञानेश्वरी पाठ
कीर्तन तालीम
कीर्तन तालीम
भागवत कथा निरूपण
भागवत कथा निरूपण